Saturday, 25 March 2017

सातवाहनांच्या इतिहासाची साधने

मागच्या लेखात आपण सातवाहन आणि आंध्र यांच्याबद्दल थोडीफार चर्चा केली आणि लेख संपवताना मी म्हणालो की पुढच्या भागात राजघराण्याविषयी लिहेन. पण हे सर्व लिहिण्याआधी सातवाहनांच्या इतिहासाची साधने कोणती याचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. कारण त्या शिवाय आपल्याला सातवाहन कळणार नाहीत आणि मग या राजाचा संदर्भ कुठून आला वगैरे प्रश्न उपलब्ध होतील. जी अत्यल्प साधने आपल्याकडे आज उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करून मग सातवाहन यांच्याविषयी काही तर्क आपण मांडू शकतो.

सातवाहनांच्या इतिहासाची साधने जर आपण पाहायला गेलो तर त्यात मुख्यत्वे, लेण्यांमध्ये असणारे ब्राह्मी लिपीतील शिलालेख, विविध सातवाहन राजांची आढळणारी नाणी, हल सातवाहन राजाने लिहिलेली गाथा सप्तशती आणि विविध पुराणातील सातवाहन राजांचा उल्लेख एवढीच काय ती माहिती आपल्याकडे उपलब्ध होते. अर्थात पुराणात पण कालावधीनुसार बदल होत गेले त्यामुळे पुराणे किती ग्राह्य धरणार हा प्रश्न राहतोच पण तो मुद्दा तात्पुरता आपण बाजूला ठेवू
.

लेण्यांमधील ब्राह्मी शिलालेख-

कार्ले लेण्यांमधील शिलालेख 
ब्राह्मी लिपी आणि तिच्या उगमाबद्दल बोलायचे झाले तर तो वेगळा विषय होईल त्यामुळे विस्तारभयास्तव या लेखात बोलणे टाळतो. तुमच्या माहितीसाठी म्हणून सोबत ब्राह्मी मधील अक्षरे कशी वाचावीत याचा एक जुजबी तक्ता देत आहे. अर्थात संपूर्ण भाषा येण्यासाठी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा तक्ता केवळ मदत म्हणून वापरावा.
महाराष्ट्रात असंख्य लेणी आहेत. काही बौद्ध धर्मीय आहेत, काही हिंदू आहेत तर काही जैन. या लेण्यांमध्ये भरपूर शिलालेख कोरलेले आहेत. यातील बहुतांश लेख हे बौधधर्मीयांचे आहेत. समाजातील सर्व घटकांचे लेख यात कोरलेले आपल्याला दिसून येतात. तर हे लेख कुठे आढळतात? त्यांचे स्थान कुठे असते?- हे लेख लेण्यांमधील प्रवेशद्वारावर, आतील तसेच बाहेरील भिंतींवर, स्तुपांवर, पाण्याच्या टाक्यांवर दिसून येतात. हे लेख प्रामुख्याने दानाविषयी आहेत परंतु काही लेख जसे की नाणेघाटातील नायनिका हिचा लेख किंवा पांडवलेण्यातील बलश्रीचा लेख हे सातवाहन राजघराण्याची माहिती देतात. बौध लेखांच्या मानाने हिंदू लेख आणि जैन लेख यांची संख्या फारच कमी आहे.

Brahmi Alphabets
Ref: Google images

या लेखाची लिपी ही ब्राह्मी असून, भाषा ही प्राकृत आहे. या लेखांमधील काही लेख हे अगदीच लहान म्हणजे एक-दोन ओळींचे आहेत तर काही लेख हे खूपच मोठे म्हणजे अगदी १०-११ ओळींचे सुद्धा आहेत. उदाहरण घ्यायचे झाले तर नाणेघाट तसेच पांडवलेण्यांतील शिलालेख. आता या लेखाचे स्वरूप कसे असते?- यातील काही लेख हे राजवंशीयांचे असतात तर काही लेख हे सामान्य लोकांचे असतात. राजघराण्यातील लोकांच्या लेखात सुरुवातीला ओम, स्वस्ति, नंतर राजाची स्तुती, पराक्रमाचे वर्णन आणि नंतर तो लेख कोरला जाण्याचे कारण हे नमूद केलेले असते. अर्थात हे सर्व ठिकाणी असेल असे नाही. सामान्य लोकांच्या लेखात, कधीतरी कालगणना, राजाचे नाव हे दिसून येते. पण मुख्यत्वे दिलेले दान आणि कुणी दिले हेच दिसून येते.

सातवाहन कालीन लेख हा खूप मोठा विषय आहे त्यामुळे इथे नुसती ओळख करून देऊन मी तो सोडत आहे. परंतु अधिक अभ्यास करणाऱ्यांनी डॉ. मंजिरी भालेराव यांचे डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केलेले ‘महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार’ हे पुस्तक जरूर वाचावे. त्यात त्यांनी लेख या विषयावर अतिशय सुंदर लिहिले आहे तसे विविध लेण्यांमधील लेखाचे लिप्यंतर सुद्धा दिले आहे.

सातवाहनकालीन नाणी-

Roaring lion standing left facing yupa (sacrificial altar), with Brahmi legend 'Siri Satavahanasa' above and 3-arched hill belowRef: www.vcoins.com

सातवाहन यायच्या आधी सुद्धा महाराष्ट्रात प्रिंटची नाणी होती. पण सातवाहन राजांनी आपल्या नावाची नाणी पडली. या राजांची तांब्याची नाणी औरंगाबाद, हैद्राबाद वगैरे ठिकाणी सापडली आहेत तर शिशाची नाणी नेवासे, कोंडापूर या ठिकाणी सापडली आहेत. तसेच चांदीचा मुखवटा असणारी नाणी सुद्धा सापडली आहेत. यात प्रत्येक राजाचे नाणे वेगळे असे आहे. प्रत्येक राजाचा लेख वेगळा तसेच त्यावरील कोरलेल्या आकृत्या वेगळ्या. खाली विविध सातवाहन राजांच्या नाण्यावरील लेख देत आहे.

  ü सिमुक सातवाहन राजा- या राजाच्या नाण्यात उजवीकडे सोंड करून असलेला हत्ती दिसून येतो तर त्याच्या मागे सिरी सादवाह असा लेख कोरलेला आढळून येतो. तर काही नाण्यात उजवीकडे उभा असलेला वृषभ, त्याच्या पाठीवर तीन टेकड्यांचा पर्वत आणि त्याच्या सभोवताली ‘रञो सिरी सातवाहनस’ असा लेख दिसून येतो. या नाण्याच्या मागील बाजूस डावीकडे एक चिन्ह, उजवीकडे एक वृक्ष व टेकड्या व नदी कोरली दिसून येते. 
  ü  प्रथम सातकर्णी- याच्या नाण्यावर ‘रञो सिरी सातकणिस’ किंवा ‘रञो सिरी-सातकंणि’  असा लेख कोरलेला दिसून येतो.
  ü  गौतमीपुत्र सातकर्णी- ‘रञो गोतमीपुतस सिरी सातकणिस’ असा कोरलेला लेख. 
  ü  वशिष्ठीपुत्र पुळूमावी- ‘रञो वशिष्ठीपुतस सिवसिरी पुळूमावीस’ असा कोरलेला लेख.
  ü  स्कंद सातकर्णी- ‘सिरी खद सातकणिस’ असा लेख.
  ü  वशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी- ‘रञो वशिष्ठीपुतस सिरी खद (सातकणिस)’  असा लेख.
  ü  यज्ञ सातकर्णी- ‘रञो सिरी यञ [सातकणिस] असा लेख
  ü  विजय सातकर्णी- ‘[ज] य सातकणिस’ हा लेख.
  ü  वशिष्ठीपुत्र चंद्रस्वाती- ‘रञो वासिठीपुतस सिरीचदसातिस’ असा लेख.

Elephant with raised trunk standing right, with Brahmi legend Rano 'Siri Kubha Sataka(nisa)' above Reverse: 4-orbed 'Ujjain' symbol
 Ref: www.vcoins.com

अशी असंख्य राजांची नाणी महाराष्ट्र, तसेच आंध्र मधील विविध भागात सापडली आहेत. सर्वांचा उल्लेख करणे इथे शक्य नाही. अभ्यासकांनी श्री. मिराशी यांचे ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव लेख’ हे पुस्तक जरूर वाचावे’.

गाथा सप्तशती- 

तिसरे महत्वाचे साधन ठरते ते हल नावाच्या सातवाहन राजाने संपूर्ण भारतातून सुमारे एक कोटी गाथा गोळा करून सुमारे सातशे गाथांचा गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिला. खालील श्लोकातून हे स्पष्ट होते.

सत्तसआइं कइवच्छेलेण कोडीअ मज्झआरम्मि।
हालणे विरइआइं सालंकारणं गहाणं॥

बाणाने आपल्या ‘हर्षचरित’ च्या सुरुवातीला या गाथेची स्तुती केली आहे. तो म्हणतो,

अविनाशनमग्राम्यकरोत् सातवाहनः ।
विशुद्धजातिभी: कोश रत्नैरीव सुभाषितैः ॥

गाथासप्तशती हा ग्रंथ म्हणजे अनेक गाथांचे संपादन आहे. यात विविध राजांच्या पदरी कवींच्या गाथा आहेत तसेच अनेक लेखकांनी लिहिलेल्या गाथा आहे. या गाथांचा अभ्यास करताना तत्कालीन समाजजीवन कसे होते याची उत्तम माहिती मिळते. बहुतांश गाथा या प्रेमगीत स्वरूपाच्या आहेत परंतु एकंदर कुटुंबव्यवस्था कशी होती याचा अभ्यास करताना हा ग्रंथ महत्वाचा ठरतो. श्री. सदाशिव जोगळेकर यांनी या ग्रंथाचे मराठी भाषांतर करून तो प्रथम प्रकाशित केला तो ‘गाथा सप्तशती’ या नावानेच’
पुराणे- याशिवाय नंतरच्या काळात लिहिलेल्या विविध पुराणात सुद्धा सातवाहन राजांचा उल्लेख आला. मागच्या लेखात आपण संख्येत कशी विसंगती होती ते पाहिलंच. अर्थात ही सर्व पुराणे नंतरच्या काळात असल्याने त्यात बदल होत गेले आणि त्यांचे प्राथमिक संदर्भाचे महत्व तितकेसे राहिले नाही. परंतु शिलालेख, नाणी यांच्या जोडीला अभ्यास म्हणून मत्स्य, भागवत, विष्णू या सर्व पुराणांचा अभ्यास जरूर करावा.तर ही होती ‘सातवाहनांच्या इतिहासाची साधने’. मध्ययुगीन काळातील इतिहास जसा सहज आढळतो तशी सातवाहन कालीन साधने आढळत नाहीत. ती खूप कष्ट घेऊन शोधावी लागतात, प्रत्येक साधनांचे अन्वयार्थ लावून नीट मांडणी करावी लागते. तेव्हा कुठे सातवाहन कळायला लागतात. पण एकदा का याची गोडी लागली की याच्या सारखा दुसरा विषय नाही. असो!! तूर्तास याच्या अभ्यासाची जबाबदारी तुमच्यावर टाकून रजा घेतो. पुढील लेखात सातवाहन राजांविषयीच्या माहितीसोबत पुन्हा भेटू. 


कंपासपेटी

    


कदाचित कंपासपेटी हा शब्द ऐकायला जरा विचित्र वाटतो, त्याचं कारण म्हणजे हल्ली लोकं पाऊच वापरतात आणि मी सेमी मधला असल्याने सगळे शब्द अर्धवट करायची सवय आहे, त्यामुळे सध्या तरी कंपासपेटीच म्हणूया!!
    
तर आमच्या शालेय जीवनातील हा एक अविभाज्य घटक!! ज्या वस्तूशिवाय आपले बालपण कधीच पूर्ण झाले नसते!! मला अजूनही आठवतं आहे, आमच्याइथे भगवानदास नावाचे एक दुकान होते, कदाचित गावातील शाळेच्या गोष्टी मिळणारे एकमेव दुकान! तर पहिली दुसरीत असताना सगळ्यांच्याकडे त्या प्लास्टिक च्या कंपासपेट्या असायच्या.. त्यात पण वेगवेगळे प्रकार असायचे! त्यादिवशी मला वह्या घ्यायच्या होत्या म्हणून दुकानात गेलो होतो तर तिथे अगदी नवीन कोऱ्या पेट्या मांडून ठेवलेल्या होत्या आणि माझ्याकडे जी होती त्यात जेमतेम २-३ पेन्सिली, एखादी पट्टी, खोडरबर आणि टोकयंत्र इतकाच काय ते मावायचं.. खरं तर याच गोष्टी भरपूर झाल्या पण शाळेत सुद्धा डबल डेकर कंपासपेटीची क्रेझ आली होती, त्यामुळे अस्मादिकांकडे पण त्याच प्रकारची पेटी आली. आणि दुसऱ्या दिवशी शाळेत नेऊन हवा करायची असे ठरवले.

    घरी आल्यावर ती व्यवस्थित भरली! कंपासपेटी भरायची सुद्द्धा एक कला असते.. बरोबर ३-४ समान टोक असलेल्या पेन्सिली, त्या पण नटराज का अप्सरा हा वाद आपण नंतर पाहू. त्याच्यासोबत किमान पांढरे दिसणारे खोडरबर, लांब किंवा आखूड टोकयंत्र आणि खालच्या कप्प्यात पट्टी (व्यवस्थित आकडे असलेली) आणि काही दिवसांनी जमा होणारे पेन्सिलचे छिलके, अगदी जपून ठेवलेले! शाळेत तरी इतकेच लागायचे! याच कंपास पेटी वर शक्तिमान, स्पायडर मॅन असे सगळे आमचे बालपणातले देव सुद्धा विराजमान झालेले असायचे. तर सगळे व्यवस्थित भरून शाळेत गेलो आणि शेजारी बसलेल्या माझ्या एका मित्राला ती दाखवली. त्याने कुत्सितपणे हसल्यासारखे केले आणि दप्तरातून त्याची नवी कोरी कंपासपेटी काढली. नुसते बटण दाबले आणि पाहतो तर काय??! तीन कप्पे? ट्रिपलडेकर!! मला म्हणजे अगदी हॅ असल्यासारखे वाटले आणि आपण अगदीच पुराणकाळात जगत आहोत असे वाटायला लागले.

पाचवीला गेल्यानंतर मात्र त्याची एवढी क्रेझ राहिली नव्हती. पुढे परत ती आली ती एकदम आठवीमध्ये गेल्यावरच!! आठवीत असताना आम्हाला टेक्निकल नावाचा एक विषय होता. म्हणजे थोडेफार Engineering चे जुजबी ज्ञान!! त्यात आम्हाला शीट्स वगैरे काढायला शिकवणार होते. (रच्याकाने, कुणा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला त्याची ABCD ची शीट काढून हवी असल्यास जरूर यावे). तर त्या शीट्स काढायला मोठे काटकोन त्रिकोण घ्यावे लागले म्हणजे जे कंपास मध्ये होते छोटे त्यांचा काही उपयोग नव्हता!! त्यामुळे आता इथे कोण भारीतल्या गोष्टी आणतो याकडे सर्वांचे लक्ष. ते काटकोन त्रिकोण काय, शीट्स ठेवायला ती नळी काय, काही विचारू नका!!


एकंदरच कायम भरलेल्या असणाऱ्या कंपासपेटीमध्ये बऱ्याचगोष्टी जरी निरर्थक वाटत असल्या तरी त्या तशाच लागतात अन्यथा बाकी गोष्टींना मजा येत नाही. आयुष्याचे सुद्धा तसेच आहे की!! काही माणसे आपल्या आयुष्यात का आहेत हेच कळत नाही! पण त्यांचा उपयोग कसा करायचा हे जर कळले तर मात्र तीच माणसे नेहमी मदतीला हजर असतात आणि ती जर माणसे नसतील तर आयुष्यात सुद्धा मजा नाही


असे सर्व भरलेले पहिले की मन कसे प्रसन्न होते 

Tuesday, 21 March 2017

सिधम सातवाहनस!!!

सातकर्णी राजाचे नाणे- साभार गुगल
(सिरी) सातकणी(स) तसेच उजवीकडे सोंड असलेला हत्ती सुद्धा कोरलेला दिसून येतो
वजन- २.४८ gram 

महाराष्ट्रातील लेणी पहिली की पहिले नाव ऐकायला मिळते की ही लेणी सातवाहन कालीन आहेत आणि मग प्रश्न पडतो की हा सातवाहन नक्की कोण? तो कुठे होता? त्याच्या बद्दल काय काय माहिती उपलब्ध आहे? त्याचे कार्य काय?. असे असंख्य प्रश्न मनात ठेवत आपण ती लेणी पाहत असतो, तिथे असलेले अगम्य भाषेतील शिलालेख बघत असतो, भगवान बुद्धाची मूर्ती बघून एक जुनी वास्तू पाहिली या आनंदात घरी जातो तरी ते प्रश्न काही पिच्छा सोडत नाहीत. या सर्वांची उत्तरे मिळवण्यासाठी या लेखाचा प्रपंच!!

सध्याच्या घडीला आपल्याला माहिती असलेला महाराष्ट्राचा इतिहास हा सातवाहनांपासून सुरु होतो!! त्याच्या आधी महाराष्ट्रात काय झाले याची काहीच माहिती आपल्या दुर्दैवाने उपलब्ध नाही. तर, सातवाहन हा महाराष्ट्रातील पहिला राजवंश आणि म्हणूनच याचा अभ्यास करणे हे जास्त महत्वाचे ठरते. मग त्याच्या आधी महाराष्ट्र नव्हता का? तर याचे उत्तर होता असे होते. लेण्यातील काही लेखांमधून आपल्याला त्या काळी असलेल्या रठीक, भोजक अशा लहान सरंजाम सत्ताधार्यांची माहिती मिळते. पण सातवाहनांच्या इतिहासापासून आपल्याला महाराष्ट्र कसा होता, इथले सामाजिक जीवन कसे होते, व्यापार कसा होता, राज्यशासन पद्धत काय होती, कौटुंबिक जीवन कसे होते याची माहिती मिळते यातच सातवाहनांचे महत्व दिसून येते.

सलग साडेचारशे वर्ष या भूमीवर राज्य करणारा असा हा महापराक्रमी वंश. याधी किंवा या नंतर असा कोणताही राजा झाला नाही की त्याने किंवा त्याच्या वंशाने साडेचारशे वर्ष सलग राज्य केले. बरे, नुसते राज्यच केले नाही तर त्या राज्यात संपन्नता आणली, व्यापार वाढवला, कला व स्थापत्य यात भरीव कामगिरी करून पुढच्या पिढीला राज्य कसे करावे याबद्दल प्रेरणा दिली. सातवाहन राजाच्या यशाचे गमक तिथे आहे की त्याच्या राज्यातील जनता ही सुखी होती.

पुळुमावी राजाचे नाणे.
www.coinindia.com
'सिरी पुदुमावीसा रञो वशिष्ठीपुतस' असा ब्राह्मी मधील लेख या नाण्यावर कोरलेला दिसून येतो. तसेच नाण्यावर चैत्य तसेच नदी कोरलेली दिसून येते. साधारण १.८१ gram वजनाचे हे नाणे


आपले दुर्दैव की या राजाबद्दल आपल्याकडे अस्सल साधने फार तोकडी आहेत. याचे कारण म्हणजे त्या काळात लिखाण फार कमी झाले किंवा इतिहास जतन करून ठेवायला हवा असा विचार तेव्हा कुणाच्या मनाला शिवला नाही. विविध लेण्यांमध्ये असणारे विविध लेख यांवरून आपल्याला त्या काळातील समाजजीवनाची, तसेच राजांची माहिती मिळते इतकेच. पुराणात सातवाहन राजांच्या वंशावळी दिल्या आहेत मात्र सध्या उपलब्ध असलेली पुराणे ही तेव्हाची लिहिलेली पुराणे असतील का अशी शंका घ्यायला सहज वाव आहे. आता हेच बघा, वायू, ब्रम्हांड, भागवत व विष्णू ही सर्व पुराणे ३० सातवाहन राजे होऊन गेले असे सांगतात मात्र प्रत्यक्षात नवे देताना ही संख्या कमी होते. मत्स्य पुराण २९ राजे सांगते पण नावे ३० देते. आता अभ्यासकांनी ३० हा आकडा मान्य करून पुढे अभ्यास केला ती गोष्ट वेगळी. सातवाहनांचा कालावधी कोणता याबाबत पण अभ्यासकात एकमत नाही. कुणी म्हणते ख्रिस्तपूर्व पहिले शतक तर कुणी म्हणते दुसरे. याबद्दलचे विवेचन श्री. मिराशी यांनी त्यांच्या ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव लेख’ या पुस्तकात अतिशय छान मांडले आहे, ते अभ्यासकांनी जरूर वाचावे.

शुङ गानाां चापि यछिष्टं
क्षपयित्वा बलं तदा ।
सिन्धुको ह्यन्ध्रजातीयः
प्राप्स्यतीमाां वसुन्धराम् ॥

पुराणातील वरील श्लोकात सातवाहनांचा उल्लेख हा ‘आंध्र’ असा आला आहे. त्यामुळे त्यांच्या स्थानाविषयी शंका निर्माण होतात. वास्तविक काही होण्याचे कारण नाही पण काही अभ्यासकांनी सातवाहन हे मुळचे आंध्र प्रदेशातील होते असा सिद्धांत मांडल्याने त्याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. या अभ्यासकांच्या नुसार जर त्यांचे मूळ आंध्रात होते तर लगेच सातवाहन राजे महाराष्ट्रात आले आणि इथे विशाल राज्य उभे केले आणि पुन्हा आंध्र प्रदेशात गेले असेच म्हणावे लागेल, जे संभवनीय अजिबात वाटत नाही. भांडारकर यांनी नाशिक मधल्या एका लेखात असलेले धेनुकाकट हे नाव वाचून, ते गाव आंध्र मधील धरणीकोट असावे असे सांगितले. अर्थात या गोष्टीला पुरावा काही नाहीच. कारण कार्ले किंवा घोरावडेश्वर येथील लेण्यांमध्ये सुद्धा धेनुकाकटचा उल्लेख येतो आणि तो म्हणजे तेथील रहिवाशांनी दिलेल्या दानाविषयी येतो. आता आंध्र मधील एखाद्या शहरातील एखादा व्यापारी कार्ले लेण्यांसाठी दान देण्याचे कारण काय?!! असो, धेनुकाकाट वर एक वेगळा लेख लिहिता येईल. तर सातवाहन यांचे मूळ स्थान हे आंध्र नसून महाराष्ट्र असले पाहिजे कारण महाराष्ट्रातच त्यांचे सर्वाधिक लेख आढळले आहेत आणि सुरुवातीच्या राजांची नाणी सुद्धा इथेच सापडली आहेत. याला मजबूत दुजोरा मिळतो तो म्हणजे टोलेमी म्हणतो की ‘पुळूमावी राजा प्रतिष्ठान(सध्याचे पैठण) नगरीमध्ये राज्य करतो’. आंध्र भागात सातवाहनांचा विस्तार नक्कीच झाला पण तो नंतर झाला. त्यामुळे जेव्हा पुराणे लिहिली तेव्हा सातवाहन हे आंध्र मध्ये असल्याने त्यांना ‘आंध्र’ असे नाव दिले गेले हे साहजिक आहे.

सातवाहन राजांविषयी अभ्यास करताना जाणवते की हा विषय अतिशय दुर्लक्षित केलेला आहे. त्यामुळे मध्ययुगीन इतिहासाच्या बरोबर या विषयाचा अभ्यास झाल्यास त्याकाळी समाजजीवन कसे होते आणि तिथला व्यापार कसा होता हे समजणे सोपे जाईल. या अभ्यासाला लेण्यांच्या भटकंतीची जोड दिल्यास काही नवीन बाबी सुद्धा समोर येऊ शकतात. तूर्तास हा लेख इथेच थांबवतो. पुढच्या भागात या राजघराण्याविषयीच्या माहितीसोबत आणि काही interesting गोष्टी घेऊन नक्की भेटू. Section drawing of Karla Caves

संदर्भ:-  

 • ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव लेख’ - श्री. मिराशी 
 •  'सह्याद्री' - श्री. सदाशिव जोगळेकर
 •  www.coinindia.com          

Sunday, 19 March 2017

शिवाजी राजांच्या मृत्यूबद्दल सभासद काय म्हणतो

फोटो- साभार गुगल 

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा तसा अकालीच झाला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले. पण सभासद वर्णन करतो की जाता जाता सुद्धा हा थोर मनुष्य आपल्यानंतर कसे वागा असे सांगून गेला. सभासद या प्रसंगाचे संपूर्ण वर्णन करतो. तो सांगतो की शिवाजी राजाने आपल्या सर्व जवळच्या व्यक्तीना  बोलावून घेतले. त्यांची नावे सुद्धा तो देतो. सभासद बखरीमध्ये शिवाजी राजांच्या मृत्यू बद्दल येणारे वर्णन खालील प्रमाणे- 

मग काही दिवसांनी राजास व्यथा ज्वाराची जाहाली. राजा पुण्यश्लोक. कालज्ञान जाणे. विचार पाहाता आयुष्याची मर्यादा जाली असे कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यांमध्ये सभ्य भले लोक बोलावून आणिले. बितपशील- कारकून - निळोपंत प्रधानपुत्र, प्रल्हादपंत, गंगाधरपंत [हे] जनार्दनपंताचे पुत्र, रामचंद्र निळकंठ, रावजी सोमनाथ, आबाजी महादेव, जोतीराव, बाळप्रभू चिटणिस हुजरे लोक - हिरोजी फरजंद, बाबाजी घाडगे, बाजी कदम, मुधोजी सरखवास, सुर्याजी मालुसरा, महादजी नाईक पानसंबळ. राज्य म्या शिवाजीने चाळीस हजार होनाचा पुणे महाल होता त्यावरि एक क्रोड होनाचे राज्य पैदा केले. हे गड, कोट व लष्कर पागा ऐसे मेळविले, परंतु मज माघारे हे राज्य संरक्षण करणार ऐसा पुत्र दिसत नाही. कदाचित धाकटा कुवार राजाराम वाचला तर तो एक हे राज्य वृद्धी ते पाववील. संभाजी राजे वडील पुत्र जाणता आहे, परंतु बुद्धी फटकळ आहे. अल्पबुद्धी आहे. त्यास काय करावे. आपण तो प्रयाण करतो. तुम्ही कारकून व हुजरे मराठे कदीम या राज्यातील आहा. तुम्हास या गोष्टी कळल्या असाव्या. मग काही दिवसांनी राजास व्यथा ज्वाराची जाहाली. राजा पुण्यश्लोक. कालज्ञान जाणे. विचार पाहाता आयुष्याची मर्यादा जाली असे कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यांमध्ये सभ्य भले लोक बोलावून आणिले. बितपशील - असे मातबर लोक जवळी बोलावून आणिले. मग त्यास सांगितले की आपली आयुष्याची अवधी जाली. आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार. शरीर क्षीण देखून पन्हाळियावरि संभाजी राजे वडील पुत्र यांस सांगितले [होते] की 'तुम्ही दोघे पुत्र आपणास यांस राज्य वाटून देतो. आणि उभयता सुखरूप राहणे.' म्हणोन सांगितले. परंतु वडील पुत्र संभाजी राजे यांनी ऐकिले नाही. शेवट आपला तो निदानसमय दिसताहे. मग राजियाचे कलेवर चंदनकाष्टे व बेलकाष्टे आणून दग्ध केले. स्त्रिया राजपत्न्या, कारकून व हुजरे सर्व लोकांनी सांगितले की धाकटा पुत्र राजाराम यांनी क्रिया करावी. सर्वांनी खेद केला. राजाराम यांनी अत्यंत शोक केला. त्यानंतर उत्तरक्रिया कनिष्ठांनी करावे असे सिद्ध केले. वडील पुत्र संभाजी वेळेस नाहीत, याजकरिता धाकट्यांनी क्रिया केली. राजा साक्षात् केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्वरपर्यंत द्वाही फिरली. देश काबीज केला. अदलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोंगलाई ह्या चारी पातशाह्या व समुद्रातील बेवीस पादशाह असे जेर जप्त करून, नवेच राज्य साधून मराठा पातशाहा सिंहासनाधीश छत्रपती जाहाला. प्रतिइच्छा मरण पावून कैलासास गेला. ये जातीचा कोणी मागे जाहाला नाही. पुढे होणार नाही. असे वर्तमान महाराजांचे जाहाले. कळले पाहिजे.

सभासद ने वर्णन केलेल्या शेवटच्या परिच्छेदात महाराजांची थोरवी आणि योग्यताच दिसून येते. याशिवाय इतरही अनेक साधनांमध्ये शिवाजी राजांच्या मृत्यूबद्दल उल्लेख केलेला दिसून येतो.


याशिवाय इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रात  सुद्धा राजांच्या मृत्यूबद्दल मृत्यूबद्दल माहिती मिळते. इंगलीश रेकॉर्ड्स मधील २८ एप्रिल १६८० रोजीचे हे पत्र,

Wee have certaine news that Sevajee Rajah is dead. It is now 23 days since he deceased, it's said of a bloody flux, being sick 12 days. How affaires goes in his country wee shall advise as comes to our knowledge. At present all is quiett, and Sombajee Rajah is at Pornollah.

महाराज गेल्यामुळे स्वराज्याची कधीही भरून न येणारी हानी झाली परंतु मराठ्यांचा तो धगधगता अग्नीकुंड पुढे संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाई, शाहू महाराज आणि सर्व पेशवे व अनेक मराठा सरदार यांनी सुरु ठेवला आणि महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य हे उभे राहिले. 

Thursday, 16 March 2017

Advance presentation of Indian union budget on 1st Feb. 2017- A discussion


Prime Minister Narendra Modi in a speech given on 26 October had given a straight indication that Budget 2017 would be presented a month in advance. Urging the states to align their plans according to the revised date of budget presentation, Mr. Modi had quoted that, “The new system would ensure speedier implementation of schemes.”

While giving the budget scheme, Hon. Finance minister Mr. Arun Jetly Quoted supporting the advance presentation of the budget that, Madam Speaker, the Budget for 2017-18 contains three major reforms. First, the presentation of the Budget has been advanced to 1st February to enable the Parliament to avoid a Vote on Account and pass a single Appropriation Bill for 2017-18, before the close of the current financial year. This would enable the Ministries and Departments to operationalize all schemes and projects, including the new schemes, right from the commencement of the next financial year. They would be able to fully utilize the available working season before the onset of the monsoon.”

In this article, we are going to focus on the first reform only, i.e. advance presentation of the budget on 1st February, 2017.

Effects of the advance presentation of the budget
There are few major effects of the advance presentation of the annual finance budget, which can be listed as follows-
ü  The advancement of the budget announcement date will help the entire budgetary exercise to be over by, and the finance bill to be passed and implemented from 1st April onwards instead of June. It will help companies, individuals to finalized their savings, investment and tax plans in an early period of time.
ü      Earlier, after presenting the annual budget the cabinet were getting only last month to get all the legislative approvals for the annual spending and tax proposals. But now onwards, as the process is initiated early, it will help to get this exercise by 31st of March and the government expenditure as well as tax proposals can come in force from 1st of April which will ensure better implementations of the proposed policies.    
ü    It had also decided to scrap a distinction between plan and non-plan expenditures in the annual budget besides advancing the date of the general budget, usually the last working day in February, to ensure proposals take effect from April 1.
Every subject has two sides. The one which stated above and the another which is ‘political’.

Political views of the advance presentation of the budget.

Opposition parties, including BJP’s Maharashtra ally Shiv Sena, had alleged that Bharatiya Janata Party would get an undue advantage by presenting the Union budget just before the elections starting February 4 in Goa and Punjab. Other three states going to the polls are Uttar Pradesh, Manipur and Uttarakhand. The opposition parties also claim that announcing Budget before the elections would amount to the violation of the Model Code of Conduct (MCC) for parties.

To support their claim, they have cited the example of 2012 Assembly elections when the Budget was announced after the polls. On its part, the government said that, “Budget presentation is a Constitutional exercise for the benefit of the entire country, not just a few states. Modi government had last year decided to advance Union Budget presentation from the last day of February to make the early distribution of Central funds for development works possible.”

A few more facts here would further clarify why opposition’s argument is not much sustainable, until the EC decides otherwise.

a) The Budget is always allowed to be presented on schedule unless it clashes with Lok Sabha elections. In that case a vote on account is taken.

b) In case of Budget announcement before state Assembly election, the ECI expects from the government not to announce anything aimed at voters of the state. For instance, ECI allowed the government to announce a new MSP for raw jute for 2013-14 ahead of Assembly election in Karnataka as the state didn’t have any share in jute production, according to IE.

c) The Election Commission always keeps a watch on whether an announcement is aimed at influencing voters and take necessary action. For instance, then HRD minister Arjun Singh had to face the wrath of the EC when he announced 27% reservation for OBCs in Centrally-funded institutions. The MCC for Assembly elections in Assam, Kerala, Tamil Nadu, West Bengal and Pondicherry was in force then. The government later had to clarify that no such decision was taken.

In addition to that, Supreme Court stating against the petition filled by advocate M L Sharma which stated that, “The Centre be directed to present the Union Budget in the financial year 2017-18 which would commence from April 1, instead of the proposed date of February 1said that, “There is no illustration to support that presentation of Union Budget would influence voters' mind in state elections”

Though the intentions of presenting the budget might not be the same as stated by opposition parties but indirectly it has shown the impact on the recent results of the various state elections’ results.


References-
 • http://www.financialexpress.com/budget/why-opposition-is-wrong-in-demanding-budget-ban-before-assembly-elections-2017/497315/
 • http://www.firstpost.com/politics/union-budget-2017-on-1-feb-end-of-a-colonial-hangover-for-speedy-implementation-of-schemes-3107554.html
 • http://timesofindia.indiatimes.com/india/supreme-court-dismisses-petition-seeking-postponement-of-union-budget-ahead-of-state-polls/articleshow/56732943.cms
 • http://indianexpress.com/article/business/economy/finance-minister-mulling-advancing-union-budget-by-a-month-2988682/
 • http://indiatoday.intoday.in/story/union-budget-2017-arun-jaitley-narendra-modi-trivia/1/871527.html
 • https://en.wikipedia.org/wiki/2017_Union_budget_of_India
Monday, 13 March 2017

पाऊस पडत होता


पाउस पडत होता

Photo Courtesy- Google


पाउस पडत होता
वारा उधळत होता
अंधारलेल्या सायंकाळी तो
मल्हार गात होता

धरती चिंब झालेली
भिजलेली सजलेली
आनंदाने धुंद रानात
मयूर तो नाचत होता

नुकतीच फुटलेली पालवी
हळूच वर बघत होती
तिला पाहता पाहता 
तो गुंग होत होता

हातात तिचा हात होता
नजरेला नजर भिडली होती
कोकिळेच्या गळ्यानी तो
प्रेमगीत गात होता

                                                              - शंतनु

Tuesday, 7 February 2017

कोल्हे दर्शन- योगेश पुराणिक


    फॉक्स पुरची मँगो वुमन..म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाईचे राहणारे श्रेयस आणि सागर, कछच्या रणचा राहणारा आशिष आणि पुण्यनगरीतील मी, असे एका शनिवारच्या सकाळी कोह्याच्या दर्शनार्थ निघालो सासवडला. पावसामुळे धरित्री ने एकदम हिरवा शालू नेसलेल्या अशा माळरानात आम्ही पोहोचलो . डावीकडे 3-4 ग्रे फ्रांकॉलिन उर्फ तितर दिसल्या. मस्त light पडला होता त्यांच्या बॅकग्राऊंडला सुंदर अशी पांढरी फुले होती. खूप छान फ्रेम्स मिळाल्या आणि आम्ही पुढे निघालो.

फ्रांकॉलिन उर्फ तितर

    लांबूनच आशिषला कॅमेऱ्यातून दिसले कि एक इगल एका डोंगराच्या कपारी वर असलेल्या फांदी वर बसलेला आहे. आम्ही साधारण अर्धा किमी फिरून हळू हळू त्याला approach केलं. आम्हाला पाहून त्याने उडू नये म्हणून हळू हळू दोघे दोघे झाडाच्या मागे लपून छपुन पुढे जात होतो. ते करत असतानाच पक्षी कुठला आहे हे ओळखण्यासाठी फोटो काढले. हि पक्ष्यांचे फोटो काढतांनाची पद्धत असते, जेणेकरून जरी पक्षी उडाला तरी आपल्याकडे त्याची नोंद/documentation राहते. फोटो पाहिल्यावर आमच्या लक्षात आले की तो twany eagle होता. इथे एक टीप सांगतो की कॅमेरा अथवा दुर्बिणीतून साधारण पक्षी कुठे पाहतो आहे हे बघायचे. जर त्याचे लक्ष तुमच्याकडे नसेल तर हळू हळू जवळ जात राहायचे. जर तुम्ही जमिनीवरच्या पक्षाचा फोटो काढत असाल तर काही अंतरापासून crwal म्हणजे झोपत झोपत जवळ जायचे.जर तुम्ही झाडावरच्या पक्षाचा फोटो काढत असाल तर एखादे छोटे झाड लपण म्हणून वापरत हळू हळू पुढे जायचे. आता किती जवळ जायचे त्याबद्दल पण एक लक्ष्मण रेषा असत, ती अशी की पक्षी अचानक हालचाल करायला लागतो किंवा तुमच्या कडे टक लावून बघायला लागतो. अशा वेळेस तुम्ही लगेच थांबावे आणि निरीक्षण करावे. तर आता आम्ही बऱ्यापैकी जवळ पोहोचलो होतो, आहे त्या ठिकाणी थांबून पटापट फोटो घ्यायला लागलो. इगल उंचावर असल्याने माझंहे हात भरून आले होते. आमच्या अनुभवावरून आता कुठल्याही क्षणी इगल  उडेल अशी खात्री होती. 


    मी तयारच होतो आणि  त्याने भरारी घेतली. त्याचे उडणे बघून गरुड भरारी का म्हणतात ते लक्षात आले. परत एकदा टीप द्यावीशी वाटते उडणाऱ्या पक्षांचे फोटो काढण्याची. तुमचा कॅमेरा AI SERVO मोड (कॅनन कॅमेरा असला तर) वर सेट करावा. मेमरी कार्ड शक्यतो higher MBPS (extreme) प्रकारातले असावे. ह्याचा फायदा असा की फोटो काढतांना बफर मध्ये फ्रेम्स साठवल्या जातात जेणेकरून सगळी action तुम्हाला घेता येईल.
मग आम्ही परत आलो आणि कोल्ह्याच्या घरापाशी एका दगडामध्ये लपून बसलो. कोल्ह्याच घर म्हणजे जमिनी लगत केलेलं बीळ असतं. सगळ्या जणांना एकच आस लागली होती ती म्हणजे कोल्हा आणि अचानक श्रेयस हळूच म्हणाला कोल्हा. आमच्या बरोब्बर समोर च्या बाजूला डोंगरावर तो येऊन बसला होता. इतका सुंदर आणि camoflauge होता की पटकन कळत नव्हतं कि तिथे कोल्हा आहे. हळू हळू तो पुढे येत येत घराच्या दिशेने येत होता. आमच्या सर्वांचे श्वास रोखले होते...पण तेवढ्यात कसला तरी आवाज आल्याने त्याने धूम ठोकली. आम्ही तरीही शांतपणे तिथेच बसायचा निर्णय घेतला. अशा वेळेस camouflage कपडे म्हणजेच ज्या प्रदेशात तुम्ही आहेत त्याच्याशी मिळते जुळते कपडे घालावे. साधारणपणे हिरवट मातकट कपडे आणि टोपी असा पोशाख करावा आणि शांत पणे एका जागी बसून राहावे. 

  असे बसलेलो असतांना आमच्या समोरच्या दरीतून 2 ब्लॅक shouldered kite म्हणजेच कापशी घार आमच्या दिशेला उडत आल्या. पटापट काही फ्रेम्स काढल्या आणि पाहिले तर हिरव्या बॅकग्राऊंड वर पांढरी कापशी घार आणि काळे shoulder स्पष्ट पणे फोटो मध्ये दिसत होतें. काही वेळ तसेच बसून राहिलो..मधून मधून डोंबारी (लार्क) ह्याचे डिस्प्ले चालू होते. तो मधेच उंच असा वर उडायचा आणि त्याच वेगाने खाली येऊन परत वर उडायचा. हे करत असताना अतिशय मंजुळ अशी शीळ घालायचा. ह्यालाच प्रणयाराधन म्हणजेच जीवनसाथी ला रिजवणे असे म्हणतात. बराच वेळ होत आला होता म्हणून आम्ही निघायचा निर्णय घेतला ...आम्ही उठलो आणि तेवढ्यात डावीकडून कोल्हा त्याच्या घराकडे जातांना दिसला आणि आम्हाला पाहून स्तब्ध झाला. आमच्या कडे बघत असतांना मस्त अशा फ्रेम्स मिळाल्या. तो डोंगराच्या मागे गेला आणि आम्ही त्याला जास्त त्रास न देता पटकन शांतपणे मागच्या मागे गाडी कडे गेलो. माझ्या आयुष्यातील हा एक अप्रतिम दिवस होता, मला दुसऱ्यांदा कोल्हा दिसला. एकदा खूप वर्षांपूर्वी मयुरेश्वर अभयारण्यात mating करतांना दिसला होता तो अनुभव नंतर कधीतरी शब्द बद्ध करिन. ह्या सर्व दिवसाचे श्रेय आशिषला देतो.


Monday, 6 February 2017

मृत माणसाला लग्नाचे निमंत्रण

   

   जिवंत माणसाला लग्नाचे निमंत्रण देतो हे ऐकले होते पण मेलेल्या माणसाला सुद्धा लग्नाचे निमंत्रण?? ऐकून विचित्र वाटले ना? साहजिक आहे पण अशा प्रकारचे उदाहरण इतिहासात दिसून येते. पारसनिस संग्रहातील कागदपत्रे वाचताना शेजवलकर यांना याचा शोध लागला आणि पुढे त्यांनी ते डेक्कन कॉलेजच्या बुलेटीन मध्ये प्रसिद्ध केले.

  शेजवलकर लिहितात,” कागदपत्रे तपासतात अचानक हळद लावलेले एक पत्र आमच्या नजरेस पडले. जरी ते सध्या कागदावर लिहिले होते तरी आम्हाला लगेच कळून आले की ती लग्नाची निमंत्रण पत्रिका आहे. ती पत्रिका ही यजमान घरातील मृत व्यक्तीला आहे हे लगेच कळून आले.”
सातारचे छत्रपती दुसरे शाहू यांच्या धर्मपत्नी आनंदीबाई यांनी त्यांच्या मुलाच्या म्हणजे प्रतापसिंहाच्या लग्नासाठी ही पत्रिका लिहिली होती. प्रतापसिंह यांचे लग्न हे रामचंद्रराव मोहिते यांच्या बहिणीशी ठरविण्यात आले होते. लिहिलेली पत्रिका ही कै. रामराजे यांना उद्देशून लिहिली होती असे दिसून येते. 
प्रतापसिंह यांचे लग्न रामचंद्रराव मोहिते यांच्या दोन्ही बहिणींशी करण्यात आले होते. अर्थात मोठी बहीण वारल्यानंतरच हे दुसरे लग्न करण्यात आले. ही अशी पद्धत सर्वच मराठा घराण्यांमध्ये होती का हे कळण्यास मात्र मार्ग नाही. शेजवलकर लिहितात की * चिन्ह असलेले वाक्य हे स्वतः आनंदाबाई उर्फ माईसाहेब यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील मोडी लिपीत लिहिले होते.

Wednesday, 1 February 2017

पाउस सगळ्यांचाच असतो
पाउस सगळ्यांचाच असतो


तो तुझा असतो तो माझा असतो
झाडाच्या पानावर अलगद पडलेल्या
त्या थेंबांचा असतो
पाउस सगळ्यांचाच असतो

तो गडगडणाऱ्या ढगांचा असतो
बेभान वाऱ्याचा असतो
बेभान वाऱ्यात भिरभिरणाऱ्या मनाचा असतो
पाउस सगळ्यांचाच असतो

तो गंधीत धरणीचा असतो
फुटणाऱ्या कोवळ्या पानाचा असतो
वाट पाहणाऱ्या चातकाचा असतो
पाउस सगळ्यांचाच असतो

असा हा पाउस सगळ्यांचाच असतो
जो त्याला आपलेसे मानतो त्यांचा असतो
जो मानत नाही त्याचा असतो
तुम्हा आम्हा सर्वांचा असतो
असा हा पाउस सगळ्यांचाच असतो


-    शंतनु परांजपे
पुणे, ३०/१२/२०१६  


Sunday, 22 January 2017

कुंजपुरा येथील लढाई- पानिपतची सुरुवात??

      
       पानिपत प्रकरणाबद्दल वाचायला लागल्यानंतर हे लक्षात आले की नुसते युद्ध अभ्यासून चालणार नाही कारण पानिपतचे युद्ध होण्याची कारणे ही अनेक आहेत. पानिपत हे अटळ होते फक्त ते लांबवर ढकलेले इतकेच. पानिपतचे युद्ध होण्यास एक महत्वाची घटना कारणीभूत ठरली ती सदाशिवराव भाऊं यांनी केलेला कुंजपुरावरील हल्ला!! मागच्या ब्लॉग मध्ये “भाऊका घोडा” या वाक्प्रचारात कुंजपुराचा उल्लेख आला होता तर त्याबद्दल माहिती देण्यासाठीच या लेखाचा प्रपंच!

    भाऊंनी दिल्ली काबीज केली आणि दिल्ली ते कुंजपुरा हा पट्टा आपल्या ताब्यात राखण्याचे प्रयत्न चालू केले. भाऊंचा इरादा असा होता की पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडून अब्दालीस घेरून त्याला मध्ये चेपायचे. अब्दालीच्या दक्षिणेस असणाऱ्या यमुना नदीने त्याचा दक्षिणेकडे येणारा मार्ग अडवला होता. त्यामुळे भाऊ यांना इकडे हालचाली करायला वाव मिळत होता. त्यामुळे जर आग्रापासून कुंजपुरा हे गाव जर ताब्यात घेतले तर अब्दाली यमुना नदी ओलांडूच शकणार नाही अशी परिस्थिती. पूर्वेकडे असणाऱ्या गोविंदपंताना मदत पाठवून पूर्वेकडून अब्दालीवर दबाव टाकणे हा एक पर्याय भाऊंच्याकडे होता पण यमुना नदीमुळे ते शक्य नव्हते. त्यामुळे कुंजपुरा जिंकून मग पुढे सहारणपुऱ्यावरून अब्दालीस गाठणे आणि मागे चेचणे हा मार्ग भाऊना योग्य वाटला असावा. अर्थात ही खेळी त्यांनी सर्वांच्या मतेच घेतली असावी पण यमुनेचे उतार राखण्यास थोडी ढिलाई झाल्याने बागपतला अब्दालीला खाली उतरायला वाव मिळाला हे मात्र खरे!! असो, त्याबद्दल पुढे येईलच!  

कुंजपुरा लढाईच्या आधी कुंजपुरा आणि दिल्ली येथील अंतरे पाहणे हे महत्वाचे ठरेल. दिल्लीपासून कुंजपुरा हे अंतर साधारण ७८ मैल होते तसेच दिल्ली ते आग्रा हे अंतर १२० मैल. अगोदरच मराठे दिल्ली ते आग्रा हे अंतर राखण्यात शर्थीचे प्रयत्न करत होते आणि त्यात आता दिल्ली ते कुंजपुरा या ७८ मैलांची भर पडली होती. तुमच्या लक्षात येईल की बागपत हे ठिकाण दिल्ली आणि कुंजपुरा यांच्या मधेच आहे. दिल्लीपासून बागपत हे ठिकाण साधारण २० मैल आहे आणि पुढे बागपत पासून पानिपत ३४ मैल आणि पुढे कुंजपुरा अजून २४ मैल. नेटवर शोधशोध करत असताना एक उत्तम फोटो सापडला ज्यावरून तुम्हाला नेमक्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज येईल की कोणते ठिकाण कसे होते ते!! 

              

   कुंजपुराला निघण्याआधी, सदाशिवराव भाऊंनी गोविंदपंतांना एक पत्र लिहिले होते ज्यातून ते त्यांची योजना काय आहे आहे याचे वर्णन करतात. हे पत्र मराठी भाषेत सरदेसाई यांनी ‘मराठी रियासत- मध्य विभाग-३’ यात छापले आहे. भाऊ लिहितात की,      “तुम्हास तिकडे मोठ्या कामास जावयाविषयी वारंवार लिहिले, परंतु अद्याप गोपाळराव गणेश व तुम्ही गेला नाहीत. (कदाचित अब्दालीवर छोटे मोठे छापे घालण्याचे काम असावे कारण गोविंदपंतांच्याकडे थोडीफार फौज होती) कोठे किरकोळ जमीदारांचे गढागाव घेत बसला, हे ठीक नाही. या उपरी लौकर तिकडे जाऊन पेशजी लिहिल्याप्रमाणे गडबड करून धुंद उडवणे. या गोष्टीस हयगय एकंदर न करणे. यमुनेचे पाणी फार याकरिता आम्ही दिल्लीस बसणे योग्य नाही. यास्तव कुंजपुऱ्यास अब्दुसमदखानाचे पारिपत्य करावयास जात आहो. (यापुढील काही मजकूर हा दिल्लीविषयक आहे त्यामुळे तो इथे देत नाही) आम्ही कुंजपुऱ्याकडे गेलो. अब्दाली इकडे कूच करून आलीया उत्तमच झाले. दिल्लीकडून मागे मुलुख मोकळा राहील, लढाई इकडेच पडेल. कदाचित इकडे न येता तिकडे तुमचे रोख जाहले तरी बरेच आहे. आम्ही पाठीवरी यमुना उतरून अंतर्वेदीतून येऊन त्याचे पारिपत्य करू. कुंजपुरेवाला ठरत नाही. डावा डौल होऊन दमवायच्या मुद्द्यावरी आहे. ठरला तरी मोर्चे लाऊन यथास्थितच पारिपत्य करू. तुम्ही तिकडे सत्वर जाऊन पोहोचणे. (कुठे ते नेमके काळात नाही), केवळ छोट्या मोठ्या कामात गुंतोनी न राहणे. गनिमी मेहनत करून, रोहिले व सुजा यांचे प्रांतात धामधूम होईल असे करणे. अब्दाली आम्हाकडेच येईल. तिकडे आला तरी पाणी आहे, तो आहे. चार रोजात कुंजपुऱ्याचे पारिपत्य करून सारंगपुराकडे उतरून नजीबखानाचे विल्हे लावून पुढे अब्दालीचे पाठीवर येउ. ऐवज लवकर येऊन पावेसा करणे. अलीगोहारचा शिक्का दिल्लीत पडला त्याची चिठ्ठी पाठवली आहे. त्याप्रमाणे लिहून पातशहाची जरब मोडून याचे नावे करणे. लवकर जाऊन सर्व कामे यथास्थित करणे. ग्वाल्हेर आग्रा मथुरेवरून ऐवज दिल्लीस येई ते करणे. जाठ वल्लभगडास आहेत, तिकडून रसदेचा वगैरे पेच पडावयाचा नाही. त्याची फौज पुत्र हुजूर येणार. ते तेथे राहून पलीकडे पायबंद द्यावा. तिकडून तुम्ही फौज सुद्धा जाऊन शहावरी असावे. इकडे यमुनेचे पाणी हलके होताच अब्दालीचे पारिपत्य करावे असा डौल आहे. त्याजकडून तहाचे राजकारण अद्याप आहे परंतु मळमळीत आहे, ठीक नाही. येथील मर्जीनुरूप झाल्याशिवाय तह होणार नाही. प्रस्तुत आम्ही दिलीहून दोन मजली कुंजपुऱ्यास आलो. पुढे जाऊ. आलीगौहरचे पुत्र बाहेर काढून वलीहदी शुक्रवारचे मुहूर्ते केली. आपले तालुक्यातही शहाआलमचा गजशिक्का चालविणे. महिनाभर फौज उतरण्याजोगे पाणी होत नाही. कुंजपुऱ्यास समदखानाचे पारिपत्य करू, अब्दाली तिकडे आला तर उत्तम, न आलीया फिरोन घेऊ. लिहिल्याप्रमाणे तुम्ही शह देणे. जाठ आपलाच आहे. वसवास नाही.”पत्र बरेच मोठे आहे परंतु यातून बऱ्याच गोष्टी निदर्शनास येतात त्या अशा की, -
 • ·         अब्दालीसोबत लढण्यासाठी भाऊंच्याकडे एक योजना होती. पानिपत झाले हा केवळ नशीबाचा भाग. नाहीतर कुंजपुरा जिंकून वरून अब्दालीवर हल्ला करायचा भाऊंचा स्पष्ट डाव दिसून येतो.
 • ·         भाऊ अविचारी नव्हते हे सुद्धा निदर्शनास येते कारण, कुंजपुरा सारखा धाडसी हल्ला करताना त्यानी अब्दाली गोविंदपंत यांच्याकडे न जाता आपल्याकडेसुद्धा येऊ शकतो आणि इकडे युद्ध होऊ शकते याचे त्यांना पूर्ण भान होते.
 • ·         भाऊ गनिमी काव्याच्या विरोधात होते असे अनेक जणांचे म्हणणे असते आणि ते पानिपतच्या पराभवातून येणे हे साहजिक आहे परंतु इथे स्वतःच भाऊ गोविंदपंताना, “गनिमी मेहनत करून” असा सल्ला देतात यावरून ते कमीतकमी गनिमी काव्याच्या विरोधात नसावे हे कळून येते.  
 • ·         जाठ आपलाच आहे, वसवास नाही यावरून जाठ हे मराठ्यांच्या बाजूने असावे किंवा मराठ्यांना ते मदत करत असावेत असे वाटते त्यामुळे "काबिले ग्वालेरीस ठेवले नाही, मीर शाहबुदिन यांस वजिरी दिली नाही, सभागृहातील छत काढून त्याची नाणी पाडली आणि दिल्लीचा बंदोबस्त जाठांकडे दिला नाही" यावरून जाठ रुसून बसला या पानिपत बखरकार काशीरायाच्या विधानांवर पुनश्च विचार करावा लागतो. कदाचित ‘रसद पोचण्यास जाठ तुम्हास त्रास देणार नाही’ या इशारावजा वाक्यावरून तत्कालीन लोकांमध्ये जाठ रुसला आहे अशी भावना निर्माण झाली असावी."            सप्टेंबर मध्ये कुंजपुरा मोहीम करायची असे ठरल्यानंतर, काहींनी पुढे जाऊन सोनपत आणि बागपत अशी ठाणी हस्तगत केली. पानिपत जिंकल्यानंतर बळवंतराव मेहेंदळे भाऊ यांना लिहितो की, 

     "कुंजपुऱ्यास जाण्यास पानिपतपावेतो येऊन पोचले, व लोकांस तफावत आहे. नदीस पाणी आठ चार दिवस उतरावयास पाहिजेत. गिलच्यांची फौज दिल्लीजवळ पलीकडे ये काठीच आहे. कूच करून पलीकडे तीराने येणार होते. प्रस्तुत लष्करात खर्चाची निकड फारच आहे. आम्हासारख्यांनी वस्त्या मोडून खादल्या. सर्वही पेच श्रीमंतांचे प्रतापे वारतील. एक भाऊसाहेबांची हिंम्मत व लोकांवर उत्तम दृष्टी आहे, येणेकरून फत्त्तेच आहे."

तसे बघायला गेले तर कुंजपुरा काबीज करण्यामागे मराठ्यांचे दोन हेतू होते. एक म्हणजे सध्या ज्या ठिकाणी अब्दाली आहे त्या ठिकाणी अब्दाली वर मागून हल्ला करणे शक्य होणार होते आणि दुसरे म्हणजे अब्दालीच्या स्वगृही जाण्याच्या मार्गावर अडथळे येणार होते. तसेच स्वदेशातून जी मदत त्यास रसद स्वरूपात मिळत होती त्यावर बंधने येणार होती. त्यामुळे कुंजपुरा येथील मोहीम ही अनाठयी होती असे म्हणता येणार नाही .
अब्दालीला जेव्हा ही माहिती कळली तेव्हा मात्र त्याच धाबे दणाणले आणि त्याने कुंजपुरा येथील अधिकारी असेलेल्या खानास पत्र पाठवले की फौज मदतीसाठी पाठवत आहोत तर मदत येईपर्यंत टिकाव धरा. मात्र मराठ्यांच्या हाती ते पत्र लागले आणि लगेचच दोन-तीन दिवसात इब्राहिमखान गारदी याच्या तोफखान्याकडून जोराचा मारा झाला आणि किल्ल्याला भगदाड पडले. शिंदे तर दत्ताजीच्या मरणाचा बदला घेण्यासाठी त्वेषाने लढत होते. दामाजींनी किल्ल्याला पडलेल्या भगदाडातून घोडे आत घातले. त्या हर हर महादेवाच्या घोषणांतून किल्ला आणि शहर लगेचच ताब्यात आले.
कुत्बशहा आणि अब्दूस्समदखान हे मराठ्यांच्या हाती सापडले आणि दामाजीने त्यांना हत्तीवर बसवून सदाशिवरावांकडे पाठवले. अब्दालीने केलेल्या दत्ताजीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भाऊने दोघांचे मुंडके छाटण्याचा आदेश दिला. नजाबतखानाने अब्दाली साठी ठेवलेली मोठी रसद मराठ्यांच्या हाती लागली. पूर्वी लुटलेला जव्हेरगज नावाचा शिंद्यांचा हत्ती सुद्धा मराठ्यांच्या हाती लागला आणि दत्ताजीच्या वधाचा बदला घेतल्याचे समाधान शिंदेना मिळाले आणि मराठी सैनिकांमध्ये मोठे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
पानिपत समर प्रसंग  

शरण आलेल्या किंवा युद्धात कैदी सापडलेल्या सैनिकांना मारण्याचा मराठ्यांचा रिवाज नव्हता. त्यामुळे शिंदे, होळकर इत्यादी सरदार भाऊंना असे करू नका असे सांगत होते परंतु भाऊंनी कुणाचेही न ऐकता या दोघांची हत्या केली. कदाचित यामुळेच चिडून अब्दालीने जेव्हा मराठ्यांचे सैन्य त्याच्या हाती लागले तेव्हा त्यांना जिवंत नाही सोडले. त्यावेळी कसेही असले तरी ते कृत्य हे वाईटच होते आणि कदाचित त्याच क्षणाला पानिपतची खरी ठिणगी पडली असावी.
१७ ऑक्टोबर रोजी कुंजपुऱ्याचे युद्ध झाले, आणि २३ ऑक्टोबर रोजी नाना पुरंदरे याने पुण्यास पत्र लिहून कळवले की, "दिल्लीचा बंदोबस्त करून श्रीमंत कुंजपुऱ्यास आले. अब्दालीकडील दहा हजार फौज, समदखान, कुत्बखान होते, त्यांजवर हल्ला करून झुंज झाले. मोडले, गोठ लुटला. तसेच हल्ला करून गाव घेतला. लोकांस लूट पुरती घोडा, उंट विगेरे मिळाले. दाणादुणा लष्करास मिळाला. आपल्याकडील सर्व ब्राह्मण मराठे मंडळी खुश आहेत. तुम्ही झुंजाच्या खबरी भलत्या ऐकाल. घाबरे व्हाल, मातुश्री चिंता करतील यास्तव लिहित आहे."
कुंजपुऱ्यास जाऊ नये असे जाठ सदाशिवरावांना सांगत होता परंतु त्यानी ते मानले नाही. कदाचित कुंजपुऱ्यावर आक्रमण न करता जर दिल्लीस राहिले असते किंवा कुंजपुऱ्यावर जाऊन परत लगेच माघारी आले असते तर कदाचित युद्धाचा प्रसंग टाळता आला असता. पण इतिहासात जर तर ला अर्थ काहीच नसतो त्यामुळे जे झाले ते आपल्याला स्वीकारावेच लागते.
पानिपत होण्याची कारणे अनेक असली तरी कुंजपुऱ्याचे युद्ध मात्र प्रमुख कारण होते हे विसरून चालणार नाही.